अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात या जिल्ह्यात crop insurance
नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच नुकसानग्रस्त झालेल्या किंवा दुष्काळ प्रभावित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. मात्र या जिल्ह्यात मका,सोयाबीन, बाजरी, याच पिकासाठी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.
अखेर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 90 हजार शेतकऱ्यांना 113 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. मका, सोयाबीन, आणि बाजरी या तीन पिकासाठी विमा वितरित केला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र जास्त शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे. परंतु इतर पिकांचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला नाही.
आता सोलापूर जिल्ह्यात लवकरच पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वितरित केला जाणार आहे. अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे. अचानक योजनेत बदल झाल्यास तंतोतंत माहिती दिली जाईल. आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला शेती विषयक माहिती जाणून घ्या.