राज्यात या भागात 22 ते 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस..
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल दिलेला नवीन हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो राज्यात मागील 4 ते 5 दिवसापासून अनेक भागात पावसाने उघडीप घेतलेली दिसून येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांची मान्सून कडे प्रतीक्षा वेधली आहे. राज्यात आतापर्यंत 60 टक्के शेतकऱ्यांचे देखील पेरण्या झालेल्या आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरन्या अजून बाकी आहेत.
राज्यातील अनेक भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या आतुरतेत आहे. राज्यात 23 ते 30 जून दरम्यान विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र, या सर्व भागात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी वर्तवली आहे. ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस पडेल त्या शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास काही हरकत नाही. असे ही सांगितले आहे. विदर्भातही आता मान्सून लवकर सक्रिय होणार आहे.
तसेच राज्यात 26 ते 28 जून दरम्यान अति मुसळधार पाऊस पडणार आहे. मात्र 23 ते 30 जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. 26 जून पासून पावसाचा अति जोर वाढणार आहे. असे पंजाबराव डख म्हटले आहे. जर अचानक वातावरणात बदल झाला तर तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल. Panjabrao dakh