16 ते 22 जून दरम्यान या भागात मुसळधार पाऊस.. Whether update
नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाबराव डख हवामान तज्ञ यांनी 15 जून रोजी दिलेला नवीन हवामान अंदाज आपण जाणून घेऊया. राज्यात अनेक दिवसापासून मान्सूनने काही भागात जोरदार हजेरी लावलेली आहे. शेतकऱ्यांच्या देखील ओलीमुळे पेरण्या ही बाकी आहे. व तसेच अनेक शेतकऱ्यांचे आता काही भागात कापूस लागवड ही झालेली आहे. 16 जून ते 22 जून दरम्यान कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
16 ते 22 जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडेल, काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस पडेल. तर काही ठिकाणी वडे नाल्या वाहतील असा पाऊस पडेल.अशी माहिती पंजाब डख यांनी दिली. 14 जून रोजी जालना जिल्ह्यातील पानेवाडी व शेवगळ गावात ढगफुटी पाऊस पडला आहे अशी माहिती बातम्या द्वारे समोर आली आहे.
१६ ते २२ जून दरम्यान या भागात भाग बदलत पाऊस पडणार..?
नंदुरबार, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, पुणे, नगर, जालना, अशा अनेक जिल्ह्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. आज एका भागात तर उद्या एका भागात असा पाऊस पडेल. हा पाऊस मात्र एकाच ठिकाणी कायम लागू असणार नाही. काही भागात जोरदार पडेल तर काही भागात मध्यम पडेल.
पंजाबराव ढक यांनी दिलेला नवीन हवामान अंदाज तुम्ही youtube द्वारे सुद्धा देखील खाली पाहू शकता. 👇🏻