22 जून पर्यंत हवामान अंदाज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..!
पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार यंदा राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. पेरणी योग्य पाऊस जर झाला असेल तर पेरणी करण्यास काही हरकत नाही. तसेच अनेक भागात शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात 15 जून पर्यंत अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा ही देखील पाऊस पडेल. असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला.
राज्यात 15,16,17, जून दरम्यान मान्सून थोडा उघड घेण्याची शक्यता आहे. पण मात्र विदर्भात मान्सून सक्रिय राहणार आहे. तसेच पुन्हा मान्सून आपल्या कडे 18 तारखेपासून सक्रिय होणार असल्याची माहिती ही दिली आहे. सध्या मान्सूनचा खंड पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नका. राज्यात 22 जून पर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. जमिनीत एक इत ओल असल्यावर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता.
तसेच येत्या 2 – 3 दिवसात अमरावती , हिंगोली, वाशीम, जळगाव, जालना, बीड, सांगली, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, परभणी, सातारा, नगर, नाशिक, धुळे, येत्या दोन-तीन दिवसात चांगल्या पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. अचानक हवामानात बदल झाला तर तुम्हाला लवकर संदेश दिला जाईल. आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला.