Panjabrao dakh पावसाचा जोर वाढणार या तारखेपासून…
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे लाडके हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 16 जून ते 23 जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडेल. अशी माहिती त्यांनी नवीन अंदाजातून व्यक्त केली आहे. काही भागात मध्यम पडेल तर काही भागात नद्या नाल्या वाहतील असा पडेल.
17 ते 22 जून दरम्यान पडणारा पाऊस सर्वदूर नसणार आहे. हा पाऊस भाग बदलतच पडणार आहे. काही भागात मध्यंतरी काही भागात जोरदार. एकाच ठिकाणी दररोज पाऊस पडणार नाही. दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे.
राज्यातील ज्या काही शेतकरी बांधवांच्या अजून पेरण्या बाकी आहे, त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या 25 ते 30 जून दरम्यान पडणाऱ्या पावसानंतर होऊ शकत्या. या आठवड्यात डख साहेबांनी भाग बदलतच पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात संपूर्ण भागात मान्सून 25 ते 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात मात्र 25 जून पासून पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.