Mansoon breaking 18 ते 22 जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो 18 जून रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. या अंदाजाद्वारे त्यांनी विदर्भात मान्सूनचा आगमन कधी होईल किंवा कधी जोरदार पाऊस होईल. याचा संपूर्ण अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच राज्यात मान्सूनचा जोर कोणत्या तारखेपासून वाढणार याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.
पंजाबराव डख – राज्यात 18 ते 22 जून दरम्यान दररोज भाग बदलतच पाऊस पडणार आहे. 15 जून पासून अनेक भागात मानसून ने उघडीप घेतलेली आहे. तर काही भागात मान्सून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा देखील पडत आहे. विदर्भात मान्सून 23 जून पासून सुरू होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
मान्सूनचा जोर 23 ते 26 जून दरम्यान कमीच राहणार आहे. मात्र 26 ते 30 जून दरम्यान राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस होणार आहे, काही भागात नद्या, नाल्या,वडे,वाहतील असा ही पडेल. विहिरीला सुद्धा देखील पाणी येईल. असं नवीन अंदाजाद्वारे पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. Whether breaking update today