मान्सूनचा पडला खंड या तारखेपासून पाऊस जोर धरणार..
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात 9 जून ते 15 जून पर्यंत अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील आता कापूस लागवड ही केलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा झालेल्या आहे. मात्र अजून विदर्भात काही जोरदार पावसाच आगमन झालेलं नाही. अनेक भागातले शेतकरी आता चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात यंदा मान्सून लवकरच दाखल झालेला होता परंतु मान्सून ने आता तीन-चार दिवस झालेत उघडीप घेतलेली आहे. उत्तर महाराष्ट्र व तसेच विदर्भातील शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. मान्सून आता केव्हापासून जोर धरणार व मान्सूनसाठी पोषक वातावरण कधी निर्माण होणार. याची संपूर्ण माहिती के एस होसाळीकर यांनी दिली आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण राहण्याची शक्यता होसाळीकर यांनी वर्तवली आहे. जुणच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा मान्सून जोर धरू शकतो असे ही त्यांनी सांगितले आहे.
राज्यात 1 जून पासून 15 जून पर्यंत अनेक भागात मुसळधार पाऊस पडला होता. आणि आता मान्सून ने उघडीप घेतलेली आहे. के एस होसाळीकर यांनी दिलेली माहिती तुम्ही युट्युब व्हिडिओ वर सुद्धा देखील खाली पाहू शकता. 👇🏻