Pik vima 2024 एक रुपयात पिक विमा अर्ज भरायला सुरुवात.

Pik vima 2024 एक रुपयात पिक विमा अर्ज भरायला सुरुवात..!

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना, आपल्या शेती पिकाचे काही नुकसान झाल्यास, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकावर परिणाम होईल. यासाठी एक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी,दुष्काळ, कीडरोग, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पुढील हंगामासाठी आर्थिक मदत दिली जात असते.

 

शेतकऱ्यांसाठी पिक विमा 2024 हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना पिक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. पिक विमा भरण्यासाठी 15 जून 2024 ते 15 जुलै 2024 ही शेवटची तारीख जाहीर केलेली आहे. शेतकरी बांधवांनी लवकरच प्रतीक्षा न करता 2024 चा पिक विमा भरून टाकावा. तसेच csc केंद्रात जाऊन लवकर नोंदणी करून घ्यावी.

 

शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्यासाठी महत्त्वपूर्ण लागणारे कागदपत्र म्हणजे, 7/12, 8 A, बँक पासबुक, आधार कार्ड, पिक पेरा,इत्यादी. तसेच या कागदपत्रांसह लवकरच केंद्रावर जाऊन पिक विमा नोंदणी पूर्ण करून घ्यावी. पिक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख 15 जुलै 2024 निश्चित करण्यात आलेली आहे. Pik vima

 

Leave a Comment